Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर; तब्येतीत सुधार - अभिजीत मुखर्जी
Former President Pranab Mukherjee | (Photo Credit: Twitter)

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या तब्येतीमध्ये सुधार होत असल्याची स्कारात्मक बातमी त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी (Abhijit Mukherjee) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान प्रणब मुखर्जी यांचे पॅरेमीटर्स हे नियंत्रणात आणि मॅनेजेबल असल्याचं सांगताना आता त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे डॉक्टरांचे प्रयत्न आणि त्यांच्या हितचिंतकांच्या प्रार्थनांचे यश आहे. त्यांचे स्वास्थ्य सुधारावे यासाठी प्रार्थना करा असं आवाहन देखील त्यांनी ट्वीट मध्ये केले आहे.

प्रणब मुखर्जी काही खाजगी चाचण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये गेले असताना त्यांच्या चाचण्यांमध्ये कोरोनाचा रिपोर्टदेखील आला असल्याची माहिती त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून 10 ऑगस्ट दिवशी देण्यात आली होती. दरम्यान त्याच दिवशी दिल्लीच्या आर अ‍ॅन्ड आर हॉस्पिटलमध्ये प्रणब मुखर्जींवर मेंदूच्या गाठीचं ऑपरेशन झाले. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सातत्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं. Pranab Mukherjee Tests Corona Positive: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयामध्ये प्रणब मुखर्जींच्या निधनाच्या बातम्या देखील आल्या होत्या. मात्र त्यांच्या कुटुंबाकडून त्या अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

अभिजीत मुखर्जी ट्वीट

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील सध्या रूग्णालयात आहेत. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 ऑग़स्टला कोरोनावर अमित शाह यांनी मात केली असली तरीही अंगदुखी आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल केले आहे.