Pranab Mukherjee Tests Corona Positive: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण
Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरवरून स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान प्रणब मुखर्जी हे काही वेगळ्या कारणांसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा कोरोनची चाचणी दरम्यान त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी ट्वीटरवरून याची माहिती देताना आठवडाभरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केले आहे.

प्रणब मुखर्जी हे 84 वर्षीय आहेत. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सेल्फ़ आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केले आहे.

ANI Tweet

दरम्यान सध्या भारतामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावए मेदांता रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आज 22 लाख 15 हजार 75 पर्यंत पोहचला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशभरात 62,064 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर सुमारे 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात अजूनही 6,34,945 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत भारतामध्ये 15,35,744 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 44,386 जणांची कोरोना सोबतची झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा बळी गेला आहे.