Pranab Mukherjee Death Rumours: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी haemodynamically stable; निधनाच्या फेक न्यूजनंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांची ट्विटद्वारे माहिती
Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

भारताचे माजी राष्ट्रपती (Former President) प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) haemodynamically stable असल्याची माहिती मुलगा अभिजीत मुखर्जी (Abhijit Mukherjee) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रणब मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील (Delhi) आर्मीच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमध्ये (Research and Referral Hospital) मध्ये उपचार सुरु आहेत. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर आहेत. तसंच 84 वर्षीय प्रणब मुखर्जी यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान आज सकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नसून ते व्हेटिंलेटरवरच आहेत, अशी माहिती R&R Hospital मधून देण्यात आली आहे.

मेंदूतील गाठ काढल्यानंतर व्हेंटिलेटरवर असलेल्या प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. दरम्यान कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रणब मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करुन दिली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी कोविड-19 ची चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःला आयसोलेट करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

ANI Tweet:

तसंच प्रणब मुखर्जी यांच्या निधनाच्या बातम्या प्रतिष्ठीत पत्रकारांकडून सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. यावरुन देशातील मीडिया फेक न्यूजची फॅक्टरी झाली आहे, हे दिसून येते, असे म्हणत अभिजीत मुखर्जी यांनी आपले वडील haemodynamically stable असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

Abhijit Mukherjee Tweet:

दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रुग्णालयात जावून प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली होती. तसंच विद्यमान राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांनी देखील प्रणब मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशीही संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.