Modi Sarkar 3 | X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा सोहळा 9 जून ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 8 ऐवजी हा शपथविधी 9 जूनला होणार आहे. या सोहळयाला काही परदेशी पाहुणे आणि राष्ट्राध्य्क्ष/ पंतप्रधान हजर राहण्याचा अंदाज आहे. त्यांच्या वेळापत्रकानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. हा सोहळा राष्ट्रपती भवनात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

बांग्लादेशच्या पंतप्रधान Sheikh Hasina, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष Ranil Wickremesinghe आणि नेपाळचे पंतप्रधान Kamal Dahal मोदींच्या शपथविधीला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. या सोहळ्याला 8 हजार जण उपस्थित असू शकतात असा अंदाज आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शपथविधीची अंतिम वेळ आणि तारीख परदेशी पाहुणे आणि राष्ट्रप्रमुखांच्या वेळेवर ठरणार आहे. रविवार 9 जूनला सकाळी शपथविधी पार पडल्यास संध्याकाळ पर्यंत सारी मंडळी परतीचा प्रवास सुरू करू शकतात. तिसर्‍यांदा भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान होणार्‍या PM Modi यांना जगभरातून शुभेच्छा; तणावग्रस्त संबंध असतानाही Canadian PM Trudeau यांच्याकडून अभिनंदन!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी 9 जूनला झाल्यास N Chandrababu Naidu देखील त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा तमिळनाडू मधील शपथविधी सोहळा 9 ऐवजी 12 जूनला घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचा शपथविधी आधी पूर्ण करून नंतर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए च्या बैठकांसाठी नायडू सध्या दिल्लीमध्ये आहेत.