नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या पत्नीचं 'हार्ट अटॅक'च्या धक्क्याने अहमदाबाद मध्ये निधन
Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लहान भावाच्या पत्नीचं आज अहमदाबाद येथे निधन झाले. नरेंद्र मोदी यांच्या वहिनी भागवती (Bhagwati) मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. आजाराशी त्यांची झुंज आज अयशस्वी ठरली. वयाच्या 55 व्या वर्षी हार्ट अटॅकने (Heart Attack) त्यांचे  निधन झाले.

भागवती अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटमध्ये दाखल होत्या. आज संध्याकाळी त्यांच्यावर अहमदाबादच्या SG Highway परिसरात अंतिम संस्कार होणार आहेत. भागवती या  प्रल्हाद मोदी यांच्या पत्नी होत्या. प्रल्हाद मोदी हे गुजरात मध्ये Fair Price Shops Owners and Kerosene Licence Holders' Association चे प्रमुख आहेत.