Narendra Modi Announces Next Man Ki Baat On 30th June (Photo Credits: File Image)

लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) सत्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपाच्या विजयाने संपन्न झाले आणि देशात पुन्हा एकदा मोदी 0.2 सरकारची स्थापना झाली. 30 एप्रिलला मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना, श्रीलंका व मालदीव दौरा, पाठोपाठ SCO Summit बैठक आटोपल्यावर आता 30 जूनला मोदी आपल्या मन की बात (Man Ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम रेडिओ वर प्रसारित होणार असल्याची माहिती मोदींनी स्वतः आपल्या इंस्टग्राम व ट्विटर अकाउंट वरून माहिती दिली आहे. या कार्यक्रमात आपले प्रश्न पाठविण्यासाठी 1800-11-7800 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय तुम्ही MyGov Open Forum या साईटवर देखील आपले मत किंवा प्रश्न मांडू शकता.

नरेंद्र मोदी ट्विट

या कार्यक्रमाची माहिती देत मोदींनी एक ट्विट केले होते ज्यात त्यांनी "30 जून रोजी सकाळी 11 वाजता आपण पुन्हा एकदा भेटूयात. रेडिओला धन्यवाद. 130 कोटी भारतीयांच्या भावना आणि सामूहिक सामर्थ्याची देवाण-घेवाण करूयात. मला विश्वास आहे की, आपणाकडेही खूप साऱ्या गोष्टी शेअर करण्यासाठी असतील" असे म्हंटले आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी नमो ऍपवर आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. SCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)

नरेंद्र मोदी इंस्टाग्राम पोस्ट

Narendra Modi Shares Man Ki Baat Updates on Instagram (Photo Credits: Instagram)

2014 मध्ये सत्तेत आल्यापासून मोदींनी मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधण्यास सुरवात केली होती, त्यानंतर सलग पाच वर्षे हा कार्यक्रम सुरु होता, लोकसभा निवडणुकांच्या आधी 24 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे शेवटचे सत्र पार पडले होते. त्यानंतर आता पुन्हा सत्तेत आल्यावर हे मन की बात चे पहिले सत्र असणार आहे. यामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन वेगवेगळे थीम आणि विचार शेअर करावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.