PM Narendra Modi on Ashadhi Ekadashi 2019 (Photo Credits: Archived, Edited, Representative Images)

महाराष्ट्राची शान असलेली पंढरपूर वारी आज आषाढी एकादशी दिवशी संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांच्या सपत्नीक शासकीय महापूजेनंतर विठुरायाचे दर्शन सर्व भक्तांसाठी खुले झाले.  सौ प्रयाग आणि श्री विठ्ठल मारुती चव्हाण या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागात विठ्ठल रुक्मिणीचा हा उत्सव अगदी उत्साहात साजरा केला जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील पंढरपूरच्या वारीचे, विठुरायाचे आणि आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारा एक व्हिडिओ ट्विटवर वरुन शेअर केला आहे. यात पंढरपूरच्या वारीची झलक सोबतच मोदींच्या आवाजात वारीचे महत्त्व ऐकायला मिळते. (मुंबई : प्रति पंढरपूर ओळख असणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये विनोद तावडे यांच्याकडून पूजा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट:

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल माध्यमात प्रचंड अॅक्टीव असून प्रादेशिक सण उत्सवांनिमित्त जनतेला शुभेच्छा देणं, त्याचं महत्त्व पटवूून देणारे पोस्ट, व्हिडिओज ते शेअर करत असतात. देशातील सर्व प्रातांतील लोकापर्यंत पोहचण्याचा, त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे.