आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) या महाएकदशी समजल्या जाणार्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक पंढरपूरात दाखल होतात. परंतू ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं असे अनेक मुंबईकर भाविक वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी दिवशी गर्दी करतात. वडाळ्याचे विठू माऊलीचे मंदीर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी असते. यंदा महाराष्ट्र सरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी अभिषेक आणि पूजा केली आहे. Ashadhi Ekadashi 2019 Wishes Wallpapers: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा HD Images,Wallpapers च्या माध्यमातून देऊन मंगलमय करा विठू माऊलीच्या भक्तांचा आजचा दिवस!
प्रति पंढरपूरात विनोद तावडेंकडून पूजा
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें
कामक्रोधें केलें घर रितें।।
प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये विधिवत महाअभिषेक व पूजा केली. महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी साकडे घातले.
सर्व विठ्ठलभक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा! pic.twitter.com/qcFsxF4RV8
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 12, 2019
दरवर्षी पंढरपूरच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना मिळतो, तर कार्तिकी एकादशी दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा केली जाते. त्यांच्या सोबत दर्शनातील रांगेतील एका सामान्य भाविक दांमत्याला मान दिला जातो. पंढरपूरला यंदा विठ्ठल यंनी सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी सपत्नीक महापूजा, म्हणाले 'वारीने महाराष्ट्रधर्म जिवंत ठेवला'
आज आषाढी एकादशी दिवशी वारकरी बांधव आणि विठ्ठल भक्त एकादशीचा उपवास करतात. दिवसभर उपवास केल्यानंतर दुसर्या दिवशी तो सोडला जातो. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होते. वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी लाखो भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.