Ashadhi Ekadashi 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशी 2019 निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल - रुक्मिणी (Vitthal-Rukmini) मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा केली. परंपरेप्रमाणे सपत्नीक केल्या जाणाऱ्या या पूजेला देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यासुद्धा उपस्थित होत्या. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील चव्हाण दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. हा मान मिळाल्याबद्दल चव्हाण दाम्पत्याने आनंद व्यक्त केला.
दरम्यान, 'जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना!', असे म्हणत जनतेची अपेक्षापूर्ती करण्याचे साकडे देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला घातले. आषाढी एकादशी निमित्त केल्या जाणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मध्यरात्री मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी सपत्नीक पोहोचले. त्यानंतर त्यांनी २ वाजून २५ मिनिटांनी पूजेला सुरुवात केली. साधारण दीड ते पावणेदोन तास चाललेली ही पूजा मंत्रोच्चारात करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट
वारीने महाराष्ट्रधर्म जिवंत ठेवला, आपली संस्कृती टिकवून ठेवली. वारी हा सकारात्मक शक्तीचा आविष्कार आहे. वारीची शिस्त वाखाणण्यासारखी असते. मंदिर समितीने अनेक नव्या सुविधा निर्माण केल्या, त्यांचे अभिनंदन: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/EFONIKptsM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 11, 2019
दरम्यान, सपत्नीक असलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेचा मान एका वारकरी दाम्पत्यालाही मिळतो. प्रत्येक वर्षी हा मान वेगवेगळ्या दाम्पत्याला मिळतो. यंदा हा मान चव्हण दाम्पत्याला मिळाला. हे दाम्पत्य लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात येणाऱ्या सांगवी सुनेवाडी तांडा गावातील आहे. विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण असे या दाम्पत्याचे नाव आहे. (हेही वाचा, Ashadhi Ekadashi 2019 Wishes Wallpapers: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा HD Images,Wallpapers च्या माध्यमातून देऊन मंगलमय करा विठू माऊलीच्या भक्तांचा आजचा दिवस!)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट
मानाचे वारकरी: सौ प्रयाग आणि श्री विठ्ठल मारुती चव्हाण यांना मिळाला महापूजेचा मान!
हे दांपत्य सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर येथील रहिवासी असून सांगवी सुनेवाडी तांडाचे १० वर्षे सरपंच होते. १९८० पासून अर्थात ३९ वर्षांपासून ते सलग वारी करीत आहेत. #Vitthal #विठ्ठल pic.twitter.com/KfQzBnjAkF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 11, 2019
पूजा संपल्यानंतर मंदिर समिती आणि मराठा समाज यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, वारीने महाराष्ट्रधर्म जिवंत ठेवला, आपली संस्कृती टिकवून ठेवली. वारी हा सकारात्मक शक्तीचा आविष्कार आहे. वारीची शिस्त वाखाणण्यासारखी असते. मंदिर समितीने अनेक नव्या सुविधा निर्माण केल्या, त्यांचे अभिनंदन, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट
जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात.
बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना! #विठ्ठल #Vitthal pic.twitter.com/vewtpfeSay
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट
योगपूजा...
ज्ञानपूजा...
रंगपूजा...
पांडुरंग पूजा...
आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबा-रखुमाईचे आज पहाटे मनोभावे पूजन केले! pic.twitter.com/TPBvyabRv3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2019
निर्मल वारी, पर्यावरण वारी, नारीशक्ती असे अनेक उपक्रम राबविले गेले. वारीच्या सकारात्मक शक्तीचा वापर आता हरित महाराष्ट्रासाठी व्हावा!, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी महापूजा आणि सत्कारानंतर व्यक्त केली.