विंग कमांडर अभिनंदन ह्याच्या शौर्यामुळे नावाचा अर्थच बदलणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Natrndra Modi) यांनी शनिवारी दिल्ली (delhi) विज्ञान भवनात आयोजन केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान भारत जे काही करतो ते सर्वजण जवळून पाहत असतात. भारताची ताकद अशी आहे जे शब्दकोशातील शब्दांचे अर्थ बदलून टाकतो. यापूर्वी अभिनंदन (Abhinandan) या शब्दाचा अर्थ 'Congratulations' असा होता. मात्र अभिनंदन या शब्दाचा अर्थच आता बदलणार असल्याची ताकद भारताकडे आहे. त्यामुळे आत्मविश्वासाच्या जोरावर एका पराक्रमी राष्ट्रच्या रुपाने पुढे जायचे आहे. त्याचसोबत स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल उचलायचे आहे. त्यासाठी सरकार तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यातून पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरुप मायदेशात परतलेल्या विंग कमांडरबद्दल संदर्भ देत असल्याचे दिसून आले. आपल्या धाडसीपणाने पाकिस्तानला चांगलेच प्रतिउत्तर देऊन शुक्रवारी अभिनंदनला भारतात आणले गेले. मात्र अभिनंदनला भारतात आणण्यासाठी वेळ लागत असल्याने शुक्रवारी चिंता व्यक्त केली जैत होती.(हेही वाचा-जम्मू-काश्मिर: पुंछ येथे LoC वर पाकिस्तानी सैनिकांकडून जोरदार गोळीबार, तीन गावकऱ्यांचा मृत्यू)

याबाबत नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की, विंग कमांडर अभिनंदन तुमचे आपल्या घरी परत आल्याने स्वागत आहे. देशाला तुमच्या धाडसामुळे गर्व आहे. तसेच मजबूत अशा 130 करोड भारतीयांसाठी तुम्ही प्रेरणादायी ठरलात. पाकिस्तानने मिग-21 हे विमानावर हल्ला केल्याने त्याचा अपघात झाला होता.मात्र भारताने पाकिस्तानचे एफ-16 हे विमान उद्ध्वस्त करुन लावले होते.