फनी वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 1 हजार कोटींची मदत जाहीर
Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: ANI)

ओडिशा (Odisha) राज्याला फनी वादळाचा फटका बसल्याने 17 जणांचा मृत्यू होऊन राज्याचे मोठे नुकसानसुद्धा झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी फनी वादळाचा (Cyclone Fani) फटका बसलेल्या भागाची त्यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. तसेच मोदी यांच्याकडून ओडिशाला 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

त्यावेळी ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांच्यासह अन्य मंडळी हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होती. त्याचसोबत वादळाचा सामना करण्यासाटी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी उत्तम सोय केली असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. तर ओडिशा मधील 11 जिल्ह्यातील 14 हजार 835 गावांना फनी वादळाचा फटका बसला आहे.(फनी वादळात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु, NEET ची परीक्षा ढकलली पुढे)

यापूर्वी 1999 सालीही ओडिशामध्ये असेच भयानक चक्रीवादळ आले होते, त्यावेळी तब्बल दहा हजार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी राज्य सरकारचे नियोजन आणि प्रशासनाने उचललेली पावले यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची NEET ही परीक्षा ओडिशामध्ये पुढे ढकलण्यात आली आहे.