PM Narendra Modi at Qudos Bank Arena: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुडोस बँक एरिना येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत (Watch Video)
Narendra Modi | (Photo Credit- Twitter/ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सिडनी (Sydney) येथे 20 हजारांहून अधिक भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रेलियात (PM Narendra Modi at Qudos Bank Arena) आगमन होताच विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम'च्या घोषणा सुरू झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीत आहेत. यावेळी प्रवासी भारतीय समुदायाच्या लोकांनी हातात तिरंगा घेऊन त्यांचे स्वागत केले. उल्लेखनिय असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात एका सामुदायिक कार्यक्रमात भारतीय डायस्पोरा सदस्यांना संबोधित करतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही त्यांच्यासोबत आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक विशेष विमानाने सिडनीला पोहोचत आहेत. अशाच एका फ्लाइटला मोदी एअरवेज असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये तिरंग्याचे रंग परिधान करून 170 लोक येथे पोहोचले आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या ग्रुपने मेलबर्न ते सिडनी असा प्रवास केला.

व्हिडिओ

दुसऱ्या बाजूला, सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी स्टेडियमबाहेर लोक आधीच यायला लागले आहेत. आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना इतक्या लोकांकडून विनंत्या येत आहेत की त्यांची पूर्तता करणे त्यांच्यासाठी शक्य नसल्याचे खुद्द ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. (हेही वाचा, 'Welcome Modi' in Australia Sky Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनी येथे स्वागत, पाहा व्हिडिओ (Watch Video))

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील मोठ्या कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. काल त्यांचे ऑस्ट्रेलियात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भारतीय समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकांनी 'भारत माता की जय' आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणाही दिल्या. त्यांच्या स्वागतासाठी महिलांनी खास गाणेही गायले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत, हे संबोधन सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये होणार आहे. त्यासाठी विशेष तयारीही करण्यात आली आहे.