PM Modi Mann ki Baat Updates : खेळांमध्ये युवकांची कामगिरी म्हणजे मेजर ध्यानचंद यांना खरी श्रद्धांजली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
File Image of Narendra Modi addressing nation via Mann Ki Baat | (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी रविवारी (29 ऑगस्ट) 'मन की बात' (Mann ki Baat News) कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 80 वा भाग होता. या भागात पंतप्रधानांनी क्रीडा दिनाचे औचित्य साधत आपले विचार व्यक्त केले. पंतप्रधानांनी म्हटले की, ऑलंपिक आणि पैरालंपिक्स स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. या खेळाडूंची ही कामगिरी ही मेजर ध्यान चंद (Major Dhyan Chanda) यांच्या प्रति वाहिलेली श्रद्धांजलीच आहे. देशातील इतर तरुणांनीही खेळाप्रति पुढे यावे असे अवाहन केले. पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाचा पुनश्च उल्लेख करत 'सबका साथ सबका विकास' हा नाराही दिला.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले आपण सर्व देशवासीय आपल्यातील जोश जितका जितका पुढे घेऊन जाता येईल, त्यासाठी आपण जितके योगदान दऊ शकेल तेवढे सरकार 'सबका प्रयास' या मंत्राने साकार करण्याचा प्रयत्न केला जाईल. देशातील तरुणाईने संधीचा फायदा घ्यायला हवा. विविध प्रकारच्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवायला हवे. गावागावात खेळांच्या स्पर्धा सातत्याने वाढायला हव्यात. मेज ध्यानचंद यांच्यासारख्या लोकांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरुन पुढे जाणे ही आपली जबाबदारी आहे. देशात अनेक वर्षांनी ती स्थिती आली आहे ज्यात समाज, राष्ट्र सर्वजण तन, मन धन अर्पून काम करत आहेत. (हेही वाचा, National Sports Day 2021: 'हॉकीचे जादूगार' मेजर ध्यानचंद यांचा आज 119वा जन्मदिवस, भारताला खेळातून मिळवून दिली नवी ओळख)

ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात दरम्यान आध्यात्म आणि दर्शन याबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, जगातील लोक भारती अध्यात्म आणि दर्शन यांविषयी इतका विचार करतात की आपली जबाबदाही अधिक वाढते. तरीही आपण आपल्या परंपरा पुढे घेऊन जायला पाहिजे. ज्या परंपरा आता कालबाह्य झाल्या आहेत त्या आपण सोडून द्यायला पाहिजे. काळाच्या कसोटीवर टीकलेल्या परंपरा पुढे घेऊन जायला हवे, असेही ते म्हणाले.