पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज 'रोजगार मेळाव्या'चा (Rojgar Melava) शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्र सरकार (Central Government) रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 लाख सरकारी नोकऱ्या (Government Jobs) देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी या रोजगार मेळाव्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) संबोधित केले. तसेच या शुभारंभा दरम्यान आज 75,226 तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी जूनमध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2024 पूर्वी देशातीत तरुणांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार महत्वाचे निर्णय घेणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभाग विद्यमान रिक्त पदे भरण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहेत. ज्या पदांवर नियुक्त्या (Recruitment) होत आहेत त्यामध्ये सर्व श्रेणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशातील अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) देखील भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आज जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या 8 वर्षांत भारत 10 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर आला आहे. तरी अर्थव्यवस्थेबरोबर लवकरचं भारतातील बेरोजगारीचा प्रश्न देखील सुटेल असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं आहे. (हे ही वाचा:- Bank Holidays: सणासुदीच्या दिवसात आजपासून पुढील पाच दिवस बॅंका बंद! जाणून घ्या सविस्तर माहिती)
तसेच गेल्या वर्षात पंतप्रधान मुद्रा योजनेचा (Mudra Yojana) लाभ देशातील स्त्रीयांना झाल्याचं पंतप्रधान मोदींना सांगितलं. PM मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 70% महिला आहेत. अलिकडच्या वर्षांत, 8 कोटी महिला स्वयं-सहायता गटांमध्ये सामील झाल्या आहेत ज्यांना सरकार आर्थिक मदत करत आहे. याचप्रमाणे सरकार आता देशातील रोजगारास चालना देण्याचं काम करत आहे.