PM Narendra Modi’s Emergency War Room Meet With Rajnath Singh, NSA, CDS and Chiefs of All Armed Forces (Photo Credits: X/@PTI)

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज आठवडा पूर्ण झाला. 26 निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत त्यांचा त्यांच्या कुटुंबासमोरच खून करणार्‍या दहशतवाद्यांविरूद्ध सध्या देशात संतापाची लाट आहे. देशवासियांच्या मनात टोकाचा राग आणि दु:ख या दोन्ही भावना एकाचवेळी असताना भारत पाकिस्तानविरूद्ध कोणती कारवाई करणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या सार्‍या सुरक्षा दलांच्या प्रमुखांची एक बैठक पार पडली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये पीएम मोदींना सशस्त्र दलांना पाकिस्तान वर कारवाईसाठी पूर्ण  मुभा दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

ANI ने सरकारी सूत्रांचा हवाला देत 'दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचा आपला संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांच्या प्रमुखांना सांगितले आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. भारताकडून प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे सुरक्षा दलांनी ठरवावी, त्यांना पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य असल्याचे' पंतप्रधान म्हणाले आहेत असे सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video). 

पीएम मोदी यांनी दिली सैन्याला पाक विरूद्ध कारवाईसाठी  पूर्ण सूट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस आणि सर्व सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक झाली आहे. नक्की वाचा:  Pahalgam Terror Attack: 'जा जाऊन मोदींना सांगा' कर्नाटक मधील व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर त्याच्या पत्नीवर खेकसला हल्लेखोर .

भारताने सध्या सार्‍या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.काही दिवसांपूर्वी बिहार मध्ये एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जाईल यामधील हल्लेखोर आणि या हल्ल्यामागील मास्टरमाईंड्सना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कडक कारवाईला सामोरे जावं लागणार असल्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला होता.