PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास 56 इंचाची थाळी, थाळी संपवणाऱ्यास आठ लाखांच्या बक्षीसासह केदारनाथची यात्रा
Happy Birthday PM Modi| File Images

पंतप्रधान मोदींची भारत भरात मोठी फॅन फॉलोविंग (Fan Following) आहे. फक्त भाजप (BJP) या पक्षापूर्ताचं नाही तर एखाद्या सिनेस्टार (Film Star) प्रमाणे पंतप्रधान मोदींचा (PM Modi) मोठा चाहता वर्ग आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 72 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशभरात मोठी तयारी केली जात आहे. मोदींच्या काही फॅन्सकडून (Fans) वेगवेगळ्या पध्दतीने पंतप्रधानांना वाढदिवसाचं गिफ्ट (Birthday Gift) देण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, दिल्लीतील (Delhi) एका हॉटेल व्यावसायिकानेही मोदींच्या वाढदिवसासाठी वेगळचं नियोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त या हॉटेल मालकाने (Hotel Owner) 56 इंच विशेष थाळी तयार केली आहे. या अनोख्या थाळीत 56 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. या थाळीत शाकाहरी (Non Veg) आणि मांसाहरी (Veg) पदार्थांचा समावेश असणार आहे तरी या थाळीचा उपभोग घेणारा आपल्या आवडीप्रमाणे शाकाहरी किंवा मासाहरी पदार्थांची निवड करु शकतो.

 

 

या अनोख्या थाळीवर हॉटेलने मालकाकडून एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 40 मिनिटांच्या आत ही 56 इंच थाळी संपवणाऱ्यास साडे आठ लाख रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार आहे. तसेच केदारनाथ पंतप्रधान मोदींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे म्हणून 40 मिनिटांत जो ही थाळी पूर्ण संपवेल त्या लकी विनरला केदारनाथची मोफत यात्रा करता येणार आहे.या थाळीचं नाव आम्ही '56 इंच मोदी जी' (56 Inch Modi Ji) असं ठेवलं आहे. (हे ही वाचा:- Lakhimpur Rape Case: लखीमपूर प्रकरण फास्ट स्ट्रॅक कोर्टात चालविण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथचे आदेश तर पिडीतेच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर)

 

 

17 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत हॉटेलमध्ये (Hotel) ही थाळी ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. दिल्लीतील ARDOR 2.1 या हॉटेलमध्ये ही विशेष थाळी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान मोदीना (PM Modi) ARDOR 2.1 हॉटेलकडून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हॉटेल मालकांनी ही थाळी पंतप्रधान मोदींना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरी सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर हे शक्य नाही म्हणून मोदींच्या फॅन्सने या थाळीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन हॉटेलमालकांकडून करण्यात आलं आहे.