पेट्रोल डिझेल दर (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने कपात होत आहे. आज पेट्रोलच्या दरात 17 पैशांनी तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी कपात झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रती लिटर 77.56 रुपये इतके असून डिझेल 72.31 रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 83.07 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 75.76 रुपये प्रती लीटर इतके आहे. 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने कपात होत आहे.

18 ऑक्टोबरला दिल्लीत पेट्रोलची किंमत 82.62 रूपये प्रती लीटर होती आणि डिझेलची किंमत 75.58 रुपये प्रती लीटर आहे. यानंतर इंधनाच्या किंमतीत कायम घसरण पाहायला मिळाली. दिवाळीनंतर तेलाच्या किंमती कायम वाढू शकतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात आयसीईवर ब्रेंट क्रुडचे 0.18% च्या वाढीने दर प्रती बॅरल 70.78 डॉलर झाले आहे. तर नायमॅक्सवर अमेरिकी लाईट क्रुड डब्ल्युटीआयच्या डिसेंबरमध्ये 0.05% कमी झाल्याने दर 60.64 डॉलर प्रती बॅरल होते.