Petrol Diesel Tax: केंद्रापाठोपाठ 'या' राज्यांकडूनही पेट्रोल, डिझेल दरात कपात
Petrol-Diesel | (Photo Credit: ANI)

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील एक्साईज ड्यूटी (Excise Duty) अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केली. ज्यामुळे देशातील इंधन दरात घट होईल. केंद्रा सरकारच्या या निर्णयानंतरत असम (Assam), त्रिपुरा (Tripura), गोवा (Goa), मणिपुर (Manipur), कर्नाटक (Karnataka) या राज्यांनीही पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांन घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल-डिझेलवर लागणारा वॅट (VAT) कमी करण्याची घोषणा केली आहे. या राज्यांप्रमाणेच देशातील इतर राज्येही आता पेट्रोल, डिझेल दरांवरील कर कमी करुन जनतेला दिलासा देणार का याबबत उत्सुकता आहे.

पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करणारी राज्ये

  • असम
  • त्रिपुरा
  • गोवा
  • मणिपुर
  • कर्नाटक

वरील राज्यांमध्ये आज (4 नोव्हेंबर) पासून पेट्रोल, डिझेल प्रतिलीटर अनुक्रमे 12 रुपये आणि 17 रुपयांनी कमी होणा आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Excise Duty: खुशखबर! उद्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; सरकारने 5 आणि 10 रुपयांनी कमी केले उत्पादन शुल्क)

उत्तराखंड सरकारने पेट्रेलवरील वॅट दोन रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही म्हटले आहे की आमच्याही सरकारचा वॅट कमी करण्याचा विचार आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. मणीपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी म्हटले आहे की, मणीपूर सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील वॅट सात रुपयांनी कमी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

असमचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करत म्हटले की, पेट्रोल आणि डीझेल उत्पादन शुल्क कमी करण्याचा केंद्राचा निर्णय ऐकून छान वाटले. आता असम सरकारही तत्काळ 7 रुपयांनी व्हॅट कमी केले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले की, केंद्र सरकारने नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे. आता गोवा सरकारही पेट्रोल, डिझेलवरी व्हॅट 7 रुपयांनी कमी करेन.