Today's Petrol and Diesel Rate: कच्च्या तेलाच्या दरातील मंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इंधन किरकोळ विक्रेत्यांनी आज सलग दुसर्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 22 पैशांनी स्वस्त झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत 25 पैशांची घट झाली आहे. काल पेट्रोलच्या दरात 17 पैशांची कपात झाली होती तर डिझेलच्या किंमतीत 19 पैशांची कपात झाली होती.
नवी दिल्लीमध्ये आज प्रति लिटर पेट्रोलची किंमत 74.43 रुपये तर डिझेलची किंमत 67.61 रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा प्रति लिटर दर 80.03 रुपये आहे तर डिझेल 70.88 प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. इंधन दर १२ जानेवारीपासून घसरत चालला आहे. या काळात दरात 1.5 रुपये प्रतिलिटरने घट झाली आहे.
या महिन्याच्या सुरूवातीच्या काळात वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर 12 जानेवारीपासून घसरण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात पेट्रोलचे दर नव्वदीपार गेले होते आणि अल्पावधीतच हे दर शंभरीपार जाणार की काय अशी भीती वाहन धारकांना होती. परंतु, आता मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काहीसा दिलासा देत इंधनांच्या सतत वाढणाऱ्या दराला लगाम लावण्याचा प्रयत्न केला.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या मागणीपैकी 84% आयात करीत असून त्यापैकी दोन तृतीयांश इराक आणि सौदी अरेबिया यासारख्या मध्य-पूर्वेतील देशांतून येते, असे तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. सरकार त्याच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात विविधता आणण्याचा प्रयत्न करीत आहे.