Petrol and Diesel Price Today: वैश्विक तेल बाजारात चढ-उतार होत असताना सलग 14 व्या दिवशी भारतात किंमती स्थिर; पहा पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol and Diesel Prices in India | Representational Image | (Photo Credits: PTI)

जगात इंधनाच्या दरात चढ-उतार होत असताना आता IOCL ने पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) नवे जर जारी केले आहेत. आज सलग 14 व्या दिवशी इंधनाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. पेट्रोल-डिझेलचे दर 5 सप्टेंबर दिवशी तेल कंपन्यांनी 15 पैशांची कपात केली होती तेव्हापासून इंधनदर स्थिर आहेत. मागील काही दिवसांत जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल-डिझेल आणण्याचा सरकारचा प्रयत्न असेल अशी चर्चा होती. पण निर्मला सीतारमण यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 'पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही.' असं म्हटलं आहे. त्यामुळे इंधन दर कमी होण्याची एक आशा संपली आहे.

जाणून घ्या मुंबई, दिल्ली सह महत्त्वाच्या शहरातील आजचे इंधन दर

  • मुंबई - पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर
  • दिल्ली - पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर
  • चेन्नई - पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर
  • कोलकाता - पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर
  • बेंगळुरू- पेट्रोल 104.70 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लीटर

महाराष्ट्रातील आजच्या पेट्रोल किंमती, डिझेलच्या किंमती  इथे घ्या जाणून

दरम्यान रोज सकाळी 6 वाजता IOCL कडून इंधन दर जाहीर केले जातात. त्यानंतर देशभरात HPCL, BPCL आणि IOC आपले दर वेबसाईट, एसएमएस द्वारा जाहीर करतात. यामध्ये प्रत्येक राज्यात कर वेगळे असल्याने पेट्रोल, डिझेलचे दर देखील वेगवेगळे असतात.  नव्या दरांसाठी तुम्ही या कंपन्यांच्या वेबसाइट्सला भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त फोनवरुन SMS च्या माध्यमातून सुद्धा दर तपासून पाहू शकता. तर 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही जाणून घेऊ शकता.