Representational Image (File Photo)

अल्पवयीन मुलांमधील वाढती हिंसा चिंतेचे कारण ठरत असतानाच त्यात भर पाडणारी धक्कादायक घटना पंजाब (Punjab Crime News) राज्यातील पटियाला (Patiala Murder) येथून पुढे येत आहे. केवळ आयफोन 11 (iPhone 11) साठी एका मुलाने त्याच्या 17 वर्षीय मित्राची हत्या (Teen Murder Case) केली आणि मृतदेह रेल्वे रुळावर (Railway Track Death) टाकला. नवजोत सिंग असे मृताचे नाव आहे. त्याने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला होता आणि त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत सहलीला गेला होता. जेथे दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह रुळावर आढळून आला. घडल्या प्रकारामुळे त्याच्या कुटुंबीयांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. तर परिसरात खळबळ उडाली आहे.

वाढदिवस साजरा करणे दुःखाचे कारण

नवजोत सिंग यानेने 24 मार्च रोजी पटियाला येथे त्याच्या कुटुंबासह 17 वा वाढदिवस साजरा केला. दुसऱ्या दिवशी, त्याने त्याच्या पालकांना सांगितले की, तो मित्रांसोबत हरिद्वारला जात आहे. दरम्यान, त्याच दिवशी नंतर, त्याने त्यांना फोन करून सांगितले की त्याने आपला विचार बदलला आहे आणि तो घरी परतत आहे. (हेही वाचा, iPhone 11 वर दिला जतोय 5901 रुपयांचा स्पेशल डिस्काउंटसह 15 हजारापर्यंतची एक्सचेंज ऑफर)

रेल्वे रुळावर मृतदेह आढळला

घरी परतत असल्याच्या दिवशी म्हणजेच 25 मार्चच्या रात्री पोलिसांना एक अज्ञात फोन आला. ज्यामध्ये माहिती देण्यात आली की, रेल्वे रुळावर एक छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह पाहायाल मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा लक्षात आले की, मृतदेह दोन भागांमध्ये विभागला होता. त्याच्या छातीवरही अनेक जखमा होत्या. त्याची ओळख पटविणेही कठीण होत होते. पोलिसांनी सांगितले की, 'मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आम्ही गावात पोस्टर लावले. 30 मार्च रोजी हरजिंदर सिंग नावाच्या व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधला. जो त्याच्या हरवलेल्या मुलाचा शोध घेत होता. आम्ही त्यास मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला.

खुनाच्या गुन्ह्यात मित्राला अटक

तपासादरम्यान, पोलिसांना आढळले की नवजोतचा मित्र अमनजोत याने त्याला त्याच्या आयफोन 11 साठी फूस लावून त्याची हत्या केली होती. अधिकाऱ्यांनी अमनजोतकडून चोरीचा मोबाईल फोन जप्त केला. त्याला अटक करून बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.

एका अल्पवयीन साक्षीदाराने सांगितले की, अमनजोतने त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 1000 रुपये दिले. त्याने दावा केला की, त्याला नवजोतचा मृतदेह रेल्वे रुळावर ठेवण्यास मदत करण्यासाठी त्यास धमकी देण्यात आली होती, जेणेकरून खून अपघातासारखा वाटेल. या दुःखद घटनेने पटियालामध्ये खळबळ उडाली आहे, स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.