Mukesh Ambani | (File Image)

न्यूयॉर्क (New York) ची मीडीया कंपनी Paramount Global त्यांचे काही शेअर्स Viacom18Media Pvt ला विकण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. Viacom18Media Pvt ही मुकेश अंबानी यांच्या रिलायंसचा भाग आहे. रिपोर्ट्स नुसार याबाबतची बोलणी ही अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात आहे. दरम्यान या वृत्तावर Paramount,Viacom18 किंवा रिलायंस कडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांनी यावर भाष्य टाळलं आहे.

Paramount, जे सध्या Simon & Schuster book publishing arm सारख्या मालमत्तेच्या विक्रीद्वारे कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेअरद्वारे ते $550 दशलक्ष कमवू शकतात.

Viacom18 आणि Star India यांच्यातही करार झालेला आहे. आता भारतामध्ये Walt Disney Company आणि Viacom 18 Media Private Limited यांचे जॉईंट वेंचर असणार आहे. न्यूयॉर्क मध्ये 12:30 p.m. पर्यंत पॅरामाउंट शेअर्स 3.4% वाढून $10.56 वर आले आहेत. नक्की वाचा: Disney-Reliance Deal: मुकेश अंबानींनी केली मोठी डील! रिलायन्स आणि Walt Disney चा मीडिया बिझनेस होणार मर्ज .

डिस्नेच्या रिलायन्समध्ये विलीन होण्याच्या निर्णयामुळे त्यांना subscribers टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष आहे. अंबानींच्या समूहाने 1.4 अब्जाहून अधिक लोकसंख्येच्या क्रिकेट-वेड्या देशात IPL क्रिकेट खेळ विनामूल्य उपलब्ध sports broadcast segment हलवून सोडले आहे. Viacom18 ने Warner Bros Discovery Inc. कडून प्रोग्रामिंग वितरीत करण्यासाठी मोठ्या कालावधीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे हा भारतातील डिस्नेला आणखी एक सेटबॅक आहे. CBS, MTV सह  अन्य अनेक नेटवर्क ची मूळ कंपनी ही Paramount आहे.