भारतीय सेना (Photo Credit: PTI)

पाकिस्तान (Pakistan) कडून भारतीय सीमारेषेवर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. परंतु भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रतिउत्तरही दिले जाते. शुक्रवारी जम्मू-काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या जवानांना कंठस्नान घातले आहे. तर पाकिस्तान सैन्यावर मोठी कारवाई करत 12 बंकर्स उद्ध्वस्त करुन लावले आहेत. तसेच सर्जिकल स्ट्राईकनंतर ही भारतीय लष्कराने केलेली मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

पुंछ आणि राजौरी क्षेत्रात पाकिस्तानच्या सैनिकांनी घुसघोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानच्या सैनिकांचा हा कट उधळत त्यांच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातले आहे. तर काही बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती लष्करी कारवाई अधिकारी रणबीर सिंग यांनी दिली आहे. तर पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख उत्तर देण्यास इंडियन आर्मी तयार असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.(हेही वाचा- पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीमेवरील बीएसएफ जवानाचा मृत्यू)

तर 15 जानेवारी रोजी पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफ असिस्टंट कमांडर विनय प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानकच्या रेंजर्सकडून होणाऱ्या शस्रीसंधीचे उल्लंघन केले जात असल्याने भारतीय लष्कराने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.