पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीमेवरील बीएसएफ जवानाचा मृत्यू
Representational Image (Photo Credits: PTI)

जम्मू काश्मीर (Jammu-Kashmir) येथील कठुआ (Kathua) येथील सीमेवर मंगळवारी सकाळी पाकिस्तान (Pakistan) कडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबार हल्ल्याला बीएसएफ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. परंतु एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बीएसएफ (BSF) चे असिस्टंट कंमांडर विनय प्रसाद असे या मृत जवानाचे नाव आहे. या हल्लामध्ये विनय प्रसाद गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

 

सुरक्षा मंत्रालयाच्या एका प्रवक्ताने जम्मू काश्मीर येथील सीमा रेषेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याचे सांगितले आहे. तसेच पाकिस्ताच्या सैनिकांनी हत्यारे आणि दारुगोळांसह भारतीय सैनिकावंर हल्ला करत सीमा उल्लघंन केले होते.