प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

देशातील आर्थिक मंदीचा फटका विविध क्षेत्रांना सुद्धा बसला आहे. तर एका सर्व्हेनुसार धक्कादायक माहिती समोर आली असून सामान्य माणसाला मंदीचा अधिक बसला असून देशातील 66 टक्के नागरिकांना घर खर्च चालवणे मुश्किल होऊन बसले आहे. ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. दुसऱ्या बाजूला वेतनात वाढ होण्याऐवजी त्यात घट असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असून त्याचा परिणाम नागरिकांच्या खर्चावर दिसून येत आहे.

आयएएनएस सी वोटर यांच्या सर्व्हेनुसार, एकूण 65.8 टक्के नागरिकांचे असे म्हणणे आहे की, त्यांना दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे त्यांच्या खर्च वाढीमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. बजेट सादर होण्यापूर्वी करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात आर्थिक मंदीचा मुद्दा समोर आला आहे. त्यामध्ये वेतनात वाढ होत नसल्याने खाद्य पदार्थांसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत.(रेल्वेचे तिकिट बुक न झाल्यास तुम्हाला विमानाचा प्रवास करता येणार, Railofy App करणार मदत)

गेल्या वर्षात जाहीर करण्यात आलेल्या बेरोजगारीचा आकडा 45 वर्षांमधील सर्वाधिक असल्याचे समोर आले होते. तर 2014 मध्ये सुद्धा 65.9 टक्के लोकांनी सुद्धा त्यांना खर्चावर नियंत्रण ठवणे हाताबाहेर असल्याचे मान्य केले होते. सध्या सुरु असलेल्या 2020 च्या वर्षात सुद्धा महागाई दर वाढत चालला आहे. त्यामुळे जगणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल याची अपेक्षा करणे दूरची गोष्ट आहे.अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, खाद्य पदार्थांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने डिसेंबर 2019 मध्ये किरकोळ महागाई दर 65 महिन्यात 7.35 टक्क्यांवर पोहचला होता. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 4292 लोकांमधील 43.7 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, त्यांच्या उत्पन्नात वाढ न होता खर्चात अधिक वाढ झाली आहे. हे सर्वेक्षण 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या बजेटपूर्वी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे.