AtmaNirbhar Bharat Pacakge: कोरोना संकटात इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणारे 12 नवे DTH चॅनेल सुरु होणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Photo Credits-ANI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज सलग पाचवी पत्रकार परिषद घेतली. आजच्या पत्रकार परिषदेमधून शिक्षण संबंधित अनेक महत्तवपूर्ण घोषणा करण्यात आल्या. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी येत्या काळात ऑनलाईन शिक्षण (Online Education) देणारे इयत्ता पहिली ते बारावी साठी 12 नवे DTH चॅनेल सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी अगोदरच स्वयम प्रभा ही वाहिनी सुरु करण्यात आली आहे.  'वन नेशन वन डिजिटल चॅनेल' अंतर्गत 'वन क्लास वन चॅनेल'द्वारे अर्थात प्रत्येक वर्गासाठी विशेष चॅनल सुरू करून शिक्षण सुरू राहणार आहे असे सांगण्यात आले आहे. याशिवाय शिक्षण संबंधित केलेल्या घोषणांविषयी थोडक्यात जाणून घ्या..निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे जाणुन घ्या एका क्लिक वर

निर्मला सीतारमण यांनी केलेल्या शैक्षणिक घोषणा

-ई-पाठशाळा अंतर्गत 200 नव्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे,

- मल्टी-मोडमध्ये प्रवेश डिजिटल / ऑनलाइन शिक्षणासाठी PM Evidya कार्यक्रम त्वरित सुरू केला जाईल.

- शीर्ष 100 विद्यापीठांना 30 मे 2020 पर्यंत स्वयंचलितपणे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल.

-इंटरनेटची सुविधा नसणाऱ्या भागात सुद्धा टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येईल.

-दर दिवशी 4 तासाचे वर्ग या चॅनेल वर भरवले जातील.

- कोरोना संकटकाळात मानसिक तणाव आलेल्या विद्यार्थी व पालकांंसाठी मनोदर्पण हा कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे.

-अंध आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष कंंटेट तयार केला जाणार आहे.

ANI ट्विट

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदा अनेक विद्यापीठांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, कोरोना रुग्णांचे वाढते आकडे पाहता दरवर्षी जून मध्ये सुरु होणारे शैक्षणिक वर्ष सुद्धा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी हे शैक्षणिक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.