गोव्यात कोरोना व्हायरसच्या आणखी 9 रुग्णांची नोंद, राज्यात एकूण 29 प्रकरणांची नोंद;17 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
May 17, 2020 11:37 PM IST
[Poll ID="null" title="undefined"]सध्या संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध एक मोठी झुंज देत आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र यात देशवासियांना कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्म निर्भर भारत अभियान'( Atma Nirbhar Bharat Abhiyan) या नव्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज काय असले याबाबत माहिती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 4 पत्रकार परिषद घेत आहेत. आज सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण 'आत्म निर्भर भारत अभियान' पॅकेजची अखेरची माहिती देणार आहेत. या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व देशवासियांचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील आज काही घोषणा करण्याची शक्यता आहे.
जगभरात मृत्यूचे तांडव सुरु केलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 85,940 वर पोहोचली आहे. यात आतापर्यंत 2752 रुग्ण दगावले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 30, 153 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. सद्य स्थितीत देशात 53,035 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रामध्ये 1606 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली, यासह राज्यातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आजच्या 67 रुग्णांसह 1135 झाली आहे. राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत 884 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यासह एकूण रुग्णांची संख्या 18396 वर गेली आहे.