जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मध्ये शोपियनच्या रावलपोरा भागात काल (13 मार्च) रात्रीपासून भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. ही चकमक अजूनही सुरु असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पंचोर येथे अवंतीपोरा पोलिसांनी 50 RR आणि 110 BN सीआरपीएफ जवानांसह दहशतवाद्यांच्या लपायच्या एका जागेवर धाड टाकली. यावेळी एक या जवानांनी एका घरातील गोठ्यामध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या छुप्या जागेची माहिती मिळाली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या जागेत लपलेला एक दहशतवादी देखील पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याचबरोबर लष्कर ए तोयबाच्या AK-47 च्या 26 गोळ्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीरच्या भागात दहशतवाद्या कारवाया सुरुच आहेत. मात्र आपले भारतीय सैन्यही त्यांना जशाचे तसे उत्तर देत आहे. त्यात कालपासून सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करुन विजय मिळवला आहे.हेदेखील वाचा- Srinagar Encounter: जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; CRPF चे 2 जवान जखमी
#UPDATE: One terrorist killed in the encounter with security forces in Rawalpora area of Shopian, joint operation is underway.#JammuAndKashmir
— ANI (@ANI) March 14, 2021
मागील वर्षी अनंतनागमध्ये झालेल्या कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
यापूर्वी 4 जून 2020 रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून बेशूट गोळीबार करण्यात आला होता. यात हवलदार पी माथियाझगन शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा 10 जून 2020 रोजी अशा प्रकारची घटना घडली. त्यात नाईक गुरचरण सिंह शहीद झाले. सुमारे आठवड्याभरापासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून नियंत्रण रेषेच्या जवळून कोणत्याही कारणाशिवाय बेशूट गोळीबार केला जात असल्याची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली आहे.