Coronavirus (Photo Credit: IANS)

चीन देशाबाहेर बहुसंख्यांक नागरिकांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. तर गेल्या 24 तासात चीन येथे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. पण आता कोरोना व्हायरसचा शिरकाव भारतात झाला असून केरळ (Kerala) येथे त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला कोरोना झाल्याची अधिकृतरित्या पुष्टी करण्यात आली असून त्याला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, केरळ येथील ज्या रुग्णाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे तो वुहान येथील युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. रुग्णाची सध्या प्रकृती स्थिर आहे. कोरोना व्हायरसची आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

केरळ येथे 806 जणांना कोरोना व्हायरची लागण होऊ शकते त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच देशातील इंडिगो आणि एअर इंडिया यांनी ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसची लागण होण्याची संभावना आहे त्या ठिकाणांसाठी त्यांच्या विमानांची उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीती निर्माण झाली असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चालला आहे. हुबेई येथे सर्वाधिक कोरोना व्हायरस झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत.(चीन मध्ये कोरोना व्हायरसचे थैमान, गेल्या 24 तासात 38 नागरिकांचा मृत्यू)

ANI Tweet:

कोरोनाची लागण जनावरे आणि नागरिकांना होऊ शकते. याची लागण झाल्यास श्वसनासंबंधित समस्या उद्भवतात. तसेच सर्दी होणे, खोकला आणि घसा खवखवणे अशी या कोरोना व्हायरसची लक्षणे आहेत. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.