जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथील शोपिया (Shopian) येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक सुरु आहे. सुरक्षारक्षकांनी हिजबुल आणि लश्करच्या कमांडोंना सुगन परिसरातील घनाड गावात घेरले. यात सीआरपीएफ, पोलिस आणि भारतीय सेनेचे जवान सहभागी झाले आहेत. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. मात्र दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे.
दहशतवादी या परिसरात लपलेले असल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. तर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यानंतर मात्र जवानांनी त्याचे चोख उत्तर दिले.
गुरुवारी बारामूला जिल्ह्यातील सोपोरे येथे दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात चकमक झाली. तर अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून हत्यारे, दारुगोळा जप्त करण्यात आला.
Jammu and Kashmir: Exchange of fire between terrorists and Security forces in Dragad Sugan area of Shopian District. More details awaited.
— ANI (@ANI) May 30, 2019
देशात 2004 ते 2018 या दरम्यान 47 दहशतवादी हल्ल्यात एकूण 864 नागरिक मारले गेले असून 29 सुरक्षारक्षक शहीद झाले आहेत. यात जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर भागातील आकडेवारी समाविष्ट करण्यात आलेली नाही.