Jagannath Rath Yatra X/@Kapilmalik3011

Jagannath Rath Yatra Stampede: पुरी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर (Jagannath Rath Yatra Stampede) मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Chief Minister Mohan Charan Majhi) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुरीचे एसपी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांची बदली केली आहे. तथापी, रथयात्रेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पिनाक मिश्रा यांची पुरी एसपी म्हणून आणि चंचल राणा यांची पुरी जिल्हाधिकारी म्हणून तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने रथयात्रेच्या समाप्तीपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. राज्य सरकारच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या बोलताना मुख्यमंत्री माझी यांनी पीडित कुटुंबांची माफी मागितली. X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी घटनेचे कारण स्पष्ट केले, 'ही प्राणघातक दुर्घटना प्रचंड गर्दी आणि लाखो भाविकांच्या प्रभूचे दिव्य दर्शन घेण्यासाठी उत्सुकतेमुळे घडली.' (हेही वाचा - Stampede at Jagannath Rath Yatra: ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान श्री गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी; किमान 3 जणांचा मृत्यू, 50 जखमी)

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री कार्यालयाने पुष्टी केली आहे की या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विकास आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय प्रशासकीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेला प्रतिसाद म्हणून, मुख्यमंत्र्यांनी मोठे प्रशासकीय फेरबदल केले. पुरीचे जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलिस अधीक्षकांची (एसपी) बदली करण्यात आली आहे, चंचल राणा यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून आणि पिनाक मिश्रा यांची नवीन एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर SP आणि कलेक्टरची बदली - 

याशिवाय, कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल डीसीपी विष्णू पाटी आणि कमांडंट अजय पाही यांना निलंबित करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, राज्य सरकारने रथयात्रेच्या एकूण देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकारी अरविंद अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे.