Nupur Sharma: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव
Nupur Sharma | (Photo Credit: Twitter)

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशभऱ्यात नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीत हस्तांतरित करण्याची विनंती करत नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुपूर शर्माच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जीवाला धोका आहे. तसेच त्यांना बलात्कार आणि खुनाच्या धमक्या येत आहेत. संबंधित संरक्षण मिळवण्यासाठी आता नुपूर शर्मांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दरवाजा ठोठावला आहे. याआधीही नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले दिल्लीत हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कडक टिप्पणी करत त्यांची याचिका फेटाळली होती.

 

नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये (TV Debate Show) प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले. त्यांच्या वादग्रस्त विधाना विरोधात अनेक राज्यांमध्ये त्यांच्या विरुध्द एफआयआर (FIR) दाखल करण्यात आल्या. कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) त्यांना अनेकदा समन्सही बजावत लुकआउट नोटीस (Look Out Notice) जारी करण्यात आले. संबंधीत नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला (Delhi) हस्तांतरित करण्याची विनंती करत नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. (हे ही वाचा:-National Highway: खेड - भीमाशंकर या राज्यमार्ग रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा : नितीन गडकरी)

 

यापूर्वीच्या याचिकेत नुपूर शर्मा यांनी त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलं होतं. पण यावेळी त्यांना असामाजिक तत्वांकडून पुन्हा बलात्कारासह जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची सुधारित याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तरी यावर सर्वोच्च न्यायालय काय भुमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.