लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर आता देशभरात राजकीय पक्षा कामाला लागले आहेत. एकीकडे आयाराम-गयारामचं राजकारण रंगतय तर दुसरीकडे अधिकाधिक मतदारांचा समावेश करून घेण्यासाठी निवडणूक आयोग खास मोहीम राबवत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील कला, राजकारण, खेळ क्षेत्रातील मान्यवरांना ट्विटरवर टॅग करून अधिकाधिक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरणा द्या असे आवाहन केले आहे. मात्र सार्यातच सध्या व्हॉट्सअॅपवर काही खोटे मेसेज पसवले जात आहे. परदेशात स्थित असलेल्या भारतीय नागरिकांना मतदानचा हक्क बजावता येऊ शकतो अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. पण या वृत्तावर निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे.
निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया
It has come to our notice that the following FAKE NEWS is circulating on some WhatsApp groups.
It is clarified that you can only apply for voter registration online through https://t.co/oC8AwgyIdK portal pic.twitter.com/OTxjb1zFbA
— Sheyphali Sharan (@SpokespersonECI) February 21, 2019
व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज पसरवली जात आहे. त्यावर खुलासा करताना पोर्टलवर केवळ वोटर रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा आहे. व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये 'एनआरआय' वोटर म्हणून रजिस्टर करा अशा प्रकारची माहिती पसरवली जात आहे. मात्र तो मेसेज चूकीचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या या फेक मेसेज बाबत अधिक तपास सुरू आहे.
भारतामध्ये ई - वोटिंगचा पर्याय अजूनही खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे परदेशातील भारतीयांना ऑनलाईन माध्यमातून व्होटिंग करण्याचा पर्याय खुला नाही.