Nirbhaya Gangrape Case: आरोपींची फाशी अटळ, सुप्रीम कोर्टाने पवन गुप्ता याची पुर्नविचार याचिका फेटाळली
Delhi Nirbhaya Gang Rape Case (PC- Twitter)

Nirbhaya Gangrape Case: निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला सात वर्ष झाल्यानंतर आता आरोपींना फाशी अखेर उद्या (1 फेब्रुवारी) देण्यात येणार आहे. कारण आरोपी पवन गुप्ता याने फाशी देण्यापूर्वी दाखल करण्यात आलेली पुर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आरोपी पवन याने तो अल्पवयीन असल्याचे याचिकेत म्हटले होते. मात्र आता ती फेटाळून लावण्यात आली आहे. आरोपी अक्षय ठाकुर, विनय शर्मा आणि पवन कुमार यांचे वकिल एपी सिंह यांनी कोर्टात असे म्हटले होते की, दोषी हे दहशतवादी नाही आहेत.

आरोपींसाठी फक्त आता काही तास शिल्लक राहिले असून त्यांना परिवारीत सदस्यांना भेटता येणार आहे. डेथ वॉरंट अनुसार, आरोपींना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळेच आजचा त्यांच्याकडे शेवटचा दिवस असणार आहे. तिहार जेल मधील क्रमांक 3 मध्ये आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. फाशीची शिक्षा देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु करण्यात आली होती ती आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. तसेच जल्लाद पवन यांना सुद्धा तिहार जेल मध्ये राहण्याची सोय करुन देण्यात आली आहे.(Nirbhaya Case: डेथ वॉरंट जारी करणारे न्यायमूर्ती सतीश कुमार अरोडा यांची सुप्रीम कोर्टात अ‍ॅडशिनल रजिस्टर पदासाठी नियुक्ती)

दरम्यान, निर्भया या 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर, 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला गेले. त्यानंतर तिच्यावर निर्घृण हल्ला केला. या घटनेनंतर 13 दिवसांनी सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार घेत ती मरण पावली. या घटनेच्या तब्बल 7 वर्षानंतर व्यायालयाने हा निर्णय दिला आहे.