Nirbhaya Case: डेथ वॉरंट जारी करणारे न्यायमूर्ती सतीश कुमार अरोडा यांची सुप्रीम कोर्टात अ‍ॅडशिनल रजिस्टर पदासाठी नियुक्ती
सुप्रीम कोर्ट (Photo Credits: PTI)

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी डेथ वॉरंट जारी करणारे न्यायमूर्ती सतीश कुमार अरोडा यांची बदली सुप्रीम कोर्टात केली आहे. येथे त्यांना अ‍ॅडिशनल रजिस्टर पदासाठी नियुक्ती करण्यात आली असून वर्षभरासाठी याचा कारभार सांभाळणार करणार आहेत. तर पटियाला हाऊस कोर्टाने 17 जानेवारीला निर्भया बलात्कार प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावत डेथ वॉरंट जारी केले. त्यावेळी 22 जानेवारीला सकाळी फाशी देण्यात येणार होती. मात्र आरोपी मुकेश याने कोर्टात दया याचिका दाखल केली. मात्र ती कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर आता फाशीची शिक्षा 1 फेब्रुवारीला होणार आहे.

तसेच आरोपी पवन गुप्ता याने सुद्धा दया याचिका दाखल करत तो अल्पवयीन असल्याचे म्हटले होते. मात्र पवन याची सुद्धा याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आता सध्या मुकेश याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली. उर्वरित तीन आरोपींनी दया याचिका कोर्टात दाखल केलेली नाही.(Nirbhaya Gangrape-Murder Case: निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारी, सकाळी 6 वाजता होणारा फाशी; कोर्टाने जारी केले डेथ वॉरंट)

ANI Tweet:

दरम्यान, निर्भया या 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर, 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला गेले. त्यानंतर तिच्यावर निर्घृण हल्ला केला. या घटनेनंतर 13 दिवसांनी सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार घेत ती मरण पावली. या घटनेच्या तब्बल 7 वर्षानंतर व्यायालयाने हा निर्णय दिला आहे.