
New Passport Rule: केंद्र सरकारने पासपोर्ट नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पासपोर्ट अर्जदारांसाठी योग्य प्राधिकरणांद्वारे जारी केलेले जन्मतारीख हे जन्मतारखेचा एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. 1980 च्या पासपोर्ट नियमांमध्ये सुधारणा लागू करणारी अधिकृत नोट या आठवड्यात जारी करण्यात आली आहे.
पासपोर्ट नियमांमधील सुधारणा ही दुरुस्ती अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन नियम लागू होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन नियमांनुसार, जन्म आणि मृत्यू निबंधक, महानगरपालिका किंवा जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत अधिकार प्राप्त इतर कोणत्याही प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र, 1 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारले जातील. नक्की वाचा: Henley Passport Index 2025: सर्वात पॉवरफूल पासपोर्टच्या यादी मध्ये भारत 80 वरून 85 व्या स्थानी घसरला!
इतर अर्जदार जन्मतारखेचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शाळा सोडल्याचा दाखला यासारखी पर्यायी कागदपत्रे सादर करू शकतात.