Henley Passport Index 2025 च्या यादीमध्ये सर्वात पॉवरफूल पासपोर्ट च्या यादीमध्ये भारताच्या पासपोर्टचा (Indian Passport) नंबर 80 वरून 85 व्या स्थानी गेला आहे. भारताच्या पासपोर्टच्या स्थानामध्ये 5 स्थानकांनी घसरण झाली आहे. Henley Passport Index मध्ये 199 देशांच्या पासपोर्टची माहिती अपडेट करण्यात आली आहे. यामध्ये व्हिसा फ्री देशांच्या यादीनुसार स्थान ठरवले जाते.
भारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात. दरम्यान या यादीमध्ये सिंगापूर चं स्थान अव्वल आहे. Henley Passport Index,च्या यादीमध्ये सिंगापूर पासपोर्ट धारक 195 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात.
पासपोर्ट रॅन्किंग मध्ये टॉप 10 देश कोणते?
सिंगापूर पाठोपाठ जपान 193 देशांमध्ये, फिनलॅन्ड 192 देशांमध्ये, फ्रान्स 192 देशांमध्ये, जर्मानी 192 देशांमध्ये, इटली 192 देशांमध्ये, साऊथ कोरिया 192 देशांमध्ये, स्पेन 192 देशांमध्ये , ऑस्ट्रिया 191 देशांमध्ये, डेन्मार्क 191 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात.
UAE गेल्या दशकात निर्देशांकावरील सर्वात मोठ्या टप्पा गाठणारा देश ठरला एक आहे, 2015 पासून अतिरिक्त 72 ठिकाणांची त्यांनी यादी वाढवली आहे, जगभरातील 185 ठिकाणी ते व्हिसा-फ्री फिरू शकतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या मिळविलेल्या 62 बांगलादेशींचे पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती - Anti-Terrorism Branch of the Pimpri-Chinchwad Police ची कारवाई .
सर्वात खाली कोणते देश?
2025 मध्ये पाकिस्तान आणि येमेन 103 व्या स्थानी आले आहेत. त्यांच्याकडे 33 देशांमध्ये व्हिसा फ्री जाण्याची संधी आहे. इराक पासपोर्टधारकांना 31 देश, सिरीया पासपोर्ट धारकांना 27 देश आणि अफगाणीस्तान पासपोर्ट धारकांना 26 देशांत जाता येणार आहे.
युनायटेड स्टेट्सच्या रॅन्किंग मध्येही घट झाली आहे. गेल्या दशकात दुसऱ्या स्थानावरून नवव्या स्थानावर ते आले आहेत. त्याचप्रमाणे, ब्रिटीश पासपोर्ट देखील 2015 मधील त्याच्या मागील टॉप रँकिंगवरून आज पाचव्या स्थानावर घसरले आहेत.