राष्ट्रीय निवडणुक आयोग लवकरच सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणार
राष्ट्रीय निवडणुक आयोग लवकरच सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणार (Photo Credits-Twitter)

राष्ट्रीय निवडणुक आयोग (National Election Commission) लवकरच सोशल मीडियाबद्दल नवीन स्वतंत्र नियमावली तयार करणार असल्याचे उच्च न्यायालयात (High Court) सांगितले आहे. तर नुकत्याच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्या आहेत. तर निवडणुक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या नंतर लगेच आचार संहिता लागू करण्यात आली आहे. मात्र आता आचार संहितेच्या काळात मतदान होण्यापूर्वी 48 तास अगोदर सर्व समाजमाध्यमांसाठी नियम अधिक काटेकोर करणार असल्याचे सांगितले जातआहे.

आचार संहितेबाबत गुगल, फेसबुक, ट्विटर आणि युट्युब यांनी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकाचा विचार केला जाणार असल्याचे निवडणुक आयोगाने शुक्रवारी उच्च न्यायालयात म्हटले आहे. त्याचसोबत हमीपत्र देऊन ही जर नियमांचे पालन न केल्यास कारवाई होणार का असे विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले होते.(हेही वाचा-तुमच्या नेत्याने आचार संहितेचा भंग केल्यास 'या' पद्धतीने तक्रार करा, निवडणुक आयोग करणार कारवाई)

त्याचसोबत आता 48 तासांआधी समाजमाध्यम आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, राजकीय जाहीरातींसाठी निवडणुक आयोगाकडून स्वतंत्र नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तर याबद्दल मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.