
कोरोना व्हायरस मुळे देशावर आलेले संकट सांभाळण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार सक्षम आहे आणि आपण या संकटावर नक्कीच मात करू असा ठाम विश्वास देशातील 93.5 % जनतेने एका सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. आयएएनएस-C Voter तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात लॉकडाउनच्या पहिल्या अवधीत देशातील 76.8 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या सक्षमतेवर विश्वास दर्शवला होता, 21 एप्रिल पर्यंतची ही आकडेवारी 93.5 टक्के लोकांपर्यंत पोहचली आहे. मार्च 16 ते 21 एप्रिल या काळात हे सर्वेक्षण घेण्यात आले होते, यामध्ये 'भारत सरकार कोरोनाचे संकट सक्षमपणे हाताळू शकेल असे मला वाटते, हो की नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लोकांचे उत्तरे घेऊन त्याचे प्रमाण काढले असता 93.5 टक्के लोकांनी सकारत्मक उत्तर देत मोदी सरकारवर विश्वास दर्शवला आहे. यामध्ये खास करून 1 एप्रिल रोजी, मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 31 मार्च पर्यंत सकारत्मक उत्तर देणाऱ्यांची टक्केवारी ही 79.4.इतकी होती. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद; कोरोना व्हायरस व लॉक डाऊनबाबत होणार चर्चा)
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसीय लॉक डाऊनची घोषणा केली होती. यामध्ये वाढ करून आता 3 मे पर्यंत देशातील सर्व राज्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. लोकांना घरातच ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, सॅनिटायजर्स, मास्क, ग्लोव्हज अशा वस्तू देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, कोरोनाची चाचणी सर्वांना करता यावी या हेतूने मोफत करण्यात आली आहे, देशात गरीब जनतेसाठी धान्य देण्यापासून ते राज्यांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करण्यापर्यंत सर्व काही केंद्र सरकार करत आहे, यामध्ये काही मुद्द्यांवर अजूनही काम करणे आवश्यक आहेच मात्र तेही होऊ शकते असा विश्वास देशवासीयांनी दर्शवला आहे.
दरम्यान, सद्य घडीला भारतात एकूण 21393 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 4257 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे 16454 कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.याबाबात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.