गुजरात: आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याला बलात्कार प्रकरणी जन्मठेप
Narayan Sai (Photo Credits: ANI/Twitter)

[Poll ID="null" title="undefined"]स्वयंघोषित अधात्मिक गुरु आसाराम बापू (Asaram Bapu) यांचा मुलगा नारायण साई (Narayan Sai) याला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शुक्रवारी न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले होते. आज या प्रकरणाची सुनावणी सुरत सत्र न्यायालयात (Surat Sessions Court) होणार होती. या सुनावणीत साईला जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली असून 1 लाखांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. (आसाराम बापूचा मुलगा, नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी; 30 एप्रिल रोजी होणार शिक्षेची सुनावणी)

ANI ट्विट:

सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. 11 वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणी त्या दोन मुलींना आज न्याय मिळाला. या प्रकरणी कोर्टात 53 जणांनी साक्ष दिली. गुन्हा दाखल होताच पसार असलेल्या नारायण साईला दोन महिन्यांनी पोलिसांनी अटक केली होती. बलात्कार प्रकरणी आसाराम  बापू यांना देखील जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.