Nagpur Crime: नागपूरमध्ये लाजिरवाणी घटना, नग्न अवस्थेत बाईकवरून फिरत होता तरुण,पोलिसांकडून अटक
Nagpur News PC TWITTER

Nagpur Crime:  सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखणाऱ्या नागपूरमध्ये (Nagpur) एक लाजिरावाणी घटना घडली आहे. मध्यरात्री एक माणूस नग्न अवस्थेत दुचाकीवरून फिरत असल्याचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. हा घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. या व्यक्तीने सभ्यता आणि सामाजिक शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सुदैवाने नागपूर पोलिसांच्या सतर्क पथकाने तातडीने कारवाई केली आहे. (हेही वाचा- गाजर पायाने धुतल्याचा संतापजनक Video व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या नग्न अवस्थेत राईड चालवणाऱ्या व्यक्तील पकडले आहे. ती व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरोपी व्यक्तीने असं का केले याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रीतकुमार बोदले असं आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रीतकुमारची मानसिक अवस्था बरी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी प्रीतकुमारचे ड्रायव्हींग लायसन्स जप्त केले आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. भविष्यात अश्या घटना पुन्हा उध्दभवणार नाही याची पोलिस कारवाई करत आहे.