Viral Video: बाजारातून आणलेली फळ भाज्या घरी आणल्यावर स्वच्छ धुणे गरजेचे असते. किटकनाशक फव्वारणी आणि भाज्यांवर लागलेली माती पासून बचाव करण्यासाठी स्वच्छ पाण्यातून धुतले जाते. आजवर कित्येक जण फळे, भाज्या घाण पाण्याने धुतात आणि तेच विक्री करतात असं ऐकलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काही व्यक्तींनी आपल्या पायांनी गाजर धुतले आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- स्विगी डिलिव्हरी बॉयने पार्सल दिल्यानंतर चोरले ग्राहकाचे Nike चे बूट
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, @foodie_saurabh_ या इंस्टाग्राम अकाउंटवर ही व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, नदीवर सर्वजण एकत्र येऊन प्रक्रिया करत आहे. गाजर बाजारात विक्रीसाठी नेण्याआधी एका टोपलीत गाजर काहींनी पायाने धुतले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी कंमेट केले आहे. फळ आणि भाज्या घरी आणल्यावर ते स्वच्छ धुवा आणि शक्य असल्यास कोमट पाण्याने धुवा. तर एकाने लिहले आहे की, हा किळसवाणा प्रकार आहे. हे गाजर धुतल्यानंतर थेट रस्त्यावर विक्रीसाठी जातात.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आजवर पाहिले आहे. काही जण अस्वच्छ पाण्याने भाजीपाला आणि फळभाज्या धुतात. या घटनांवरही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.