Swiggy Delivery Boy Steals Customer's Shoes: फूड डिलिव्हरी ॲप स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा चा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही व्यक्ती गुरुग्राममध्ये बूट चोरताना दिसत आहे. हा व्हिडिओ 9 एप्रिलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या डिलिव्हरी बॉयने गुरुग्राममधील फ्लॅटबाहेर ठेवलेले शूज चोरले आहेत. या घटनेचा व्हिडिओ रोहित अरोरा नावाच्या युजरने X वर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉयने चोरलेले शूज त्याच्या मित्राचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्विगी ग्राहक सेवा केंद्रानेही रोहितच्या तक्रारीला प्रतिसाद दिला आहे.

डिलिव्हरी बॉयच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर स्विगीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपण डायरेक्ट मेसेजवर बोलूया जेणेकरुन आम्ही तुम्हाला चांगले सहाय्य देऊ शकू,’ असे त्यांनी म्हटले आहे. स्विगीच्या या प्रतिसादावर रोहितने फूड डिलिव्हरी ॲपकडे चोरलेल्या Nike या कंपनीच्या शूजचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: Eggs Hurled At Munawar Faruqui: मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर मुनावर फारुकीवर फेकली अंडी; तक्रार दाखल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)