Mulayam Singh Yadav (Photo Credits: FB)

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची कोरोनाची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) अधिकृत ट्विटर पेजवर ही माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्या तरी त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती या पेजवर देण्यात आली आहे. या बातमीने गोंधळून गेलेल्या त्यांच्या चाहत्यांना व कार्यकर्त्यांना मुलगा अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी 'माननीय नेत्याची स्वास्थ्य स्थिर असून गुडगावच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत' अशी माहिती त्यांनी दिली आहे.

त्याचबरोबर आम्ही त्यांच्यावर उपचार करत असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या टीमसोबत सतत संपर्कात असून वेळोवेळी त्यांच्या तब्येतीबाबत माहिती घेत आहोत. असे सपा अध्यक्ष तसेच मुलायम सिंह यादवांचे पुत्र अखिलेश यादव यांनी ट्विटमधून माहिती दिली आहे. IAS Officer Sudhakar Shinde Dies Due To COVID-19: आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुलायम सिंह यादव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घ्यावी वा स्वत:ला क्वारंटाईन करुन घ्यावे अशी माहिती दिली आहे.