Monsoon Update: दिल्ली, मध्य प्रदेश, जम्मू-कश्मीरसह 'या' भागात पुढील 2-3 तासात  वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता-IMD
Monsoon Update (Photo Credits-ANI)

Monsoon Update: देशभरात विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर हवामान विभागाने जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तराखंड, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली आणि नॉर्थवेस्ट मध्य प्रदेशासह राजस्थान आणि नॉर्थ कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(MP: मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात काहीजण खड्ड्यात पडले, आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू)

त्याचसोबत सबहिमालयन, पश्चिम बंगाल. अंदमान-निकोबार बेट, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरासह आजूबाजूच्या परिसरात सुद्धा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी वेगाने वारे वाहण्यासह वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची पुढील 2-3 तासात शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.(Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन आज पासून होणार सुरु)

Tweet:

Delhi Rains Tweet:

Gujrat Rains Tweet:

Gurugram Rains Tweet:

दुसऱ्या बाजूला उत्तराखंड येथे काल रात्रीच्या सुमारास ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. उत्तरकाशी येथील मांडो गावात ही ढगफुटी झाल्याने 3 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.