मध्य प्रदेश दुर्घटना (Photo Credits-ANI)

MP: मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ येथून 120 किमी दूर विदिशा जिल्ह्यात गंजबासौदा येथे गुरुवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लाल पठार गावात असलेल्या एका खड्ड्यात मुलगा पडल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी काहीजण तेथे पोहचले. पण खुप गर्दी झाल्याने खड्ड्यावरील सीमेंटेड स्लॅब  खचला आणि त्यात 30 पेक्षा अधिकजण पडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या शर्थीने सुरु आहे. आतापर्यंत 19 जणांना बाहेर काढण्यात आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्याप काहीजणांचा शोध लागलेला नाही.

विदिशा येथील दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या भोपाळ येथून बचाव कार्यासाठी पाठवल्या. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांनी बड्या अधिकाऱ्यांशी बातचीत करुन बचाव कार्याचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. विदिशा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री विश्वास सारंग यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनानंतर भोपाल येथे रवाना झाले. या दुर्घटनेनंतर आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या परिवाराला 6 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांसह मोफत उपचार दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Jharkhand: धक्कादायक! 65 वर्षीय वृद्धाचे तोंड शिवून, हातपाय बांधून रेल्वे रुळावर फेकून दिले; पत्नी व मुलाचे कृत्य असल्याचा आरोप)

Tweet:

खरंतर गंजबासौदा येथील लाल पठार गावात संध्याकाळी 6 वाजता 14 वर्षाचा मुलगा एका खड्ड्यात पडला. जवळजवळ 30 फूट खोल असलेल्या खड्ड्यात 10-15 फूट पाणी होते. मुलगा पडल्याने तेथे लोकांची खुप गर्दी झाली. खड्डा वरुन सीमेंटेड स्लॅबने झाकला होता. पण गर्दीच्या वजनामुळे अचानक स्लॅब तूटला आणि खड्ड्यात जवळजवळ 30 हून अधिक लोक पडले. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचले. जेसीबीसह अन्य मशिनच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु केले.