रामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

Monsoon Session of Parliament 2019: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज (बुधवार, 19 जून 2019) लोकसभा (Lok Sabha) सभागृहात पुन्हा एकदा धमाल उडवून दिली. आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे कवीतेचा वापर करत आठवले यांनी असे काही काव्यात्मक भाषण केले की, जे ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही हसू आवरले नाही. तसेच, लोकसभा सभापती ओम बिरला (Om Birla) आणि अवघे सभागृहसुद्धा रामदास आठवले यांच्या काव्यरसात चिंब झाले.

त्याचे झाले असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या एनडीए-2 (NDA 02) सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन संसदेत सुरु आहे. पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा आणि निवडूण आलेल्या खासदारांनी शपथ घेतल्यावर लोकसभा सदस्यांनी बहुमताने लोकसभेच्या सभापतींचीही निवड केली. त्यानुसार खासदार ओम बिरला हे 17 व्या लोकसभेचे सभापती ठरले. दरम्यान, ओम बिरला यांच्या निवडीनंतर लोकसभेतील सदस्य त्यांचे अभिनंदन करत होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सभागृहातील इतरही काही मंत्री आणि खासदारांनी अभिनंदनपर भाषणं केली. पण, सर्वाधिक आकर्षणाचा, चर्चेचा आणि सभागृहात हस्याची लकेर उमटवणारे भाषण ठरले ते सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे.

रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना ते म्हणाले, 'राहुल गांधी यांनी जोरदार प्रयत्न केले. पण, लोकशाहीमध्ये जनमताच्या आदेशानुसार सरकार बनते. जेव्हा आपण सत्तेत होता तेव्हा मी आपल्यासोबत होतो. पण, आता आपली सत्ता नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसवाल्या लोकांनी मला म्हटले आमच्याकडे या. पण, मी हवेचा प्रवाह पाहिला आणि मोदींसोबत आलो '

पुढे बोलताना आठवले म्हणाले, विधेयकं पास करण्यासाठी विरोधी पक्षांची गरज असते. आता आम्ही सत्तेत आहोत. आमचे सरकार 5 वर्षे सत्तेत राहिली. त्यानंतरही पाच वर्षे सत्तेत राहिल आणि त्यापूढेही आम्ही सत्तेत राहू. जर आम्ही वाईट काम केले तरच आपले सरकार येईल. पण आम्ही तसे होऊच देणार नाही, असेही रामदास आठवले म्हणाले. (हेही वाचा, उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी काही फायदा नाही: रामदास आठवले)

रामदास आठवले यांची कविता त्यांच्याच शब्दात..

हर बार की तरह रामदास अठावले ने इस बार भी सदन में कविता सुनाई.

'एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिड़ला ओम

लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम

नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल

हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल

आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान

भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन'

दरम्यान, रामदास आठवले यांनी सभापती ओम बिरला यांनाही विनोदाने म्हटले की, आपण हसत नाही. पण मी आपल्याला हसवत राहीन. रामदास आठवले लोकसभेचे सदस्य नाहीत. पण, केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा प्रमुख या नात्याने त्यांनी संसदेत भाषण केल.