मामा Govinda सोबत शूट करण्यापासून Krushna ला केला गेला मज्जाव; Kapil Sharma च्या सेट वर दिसला नात्यातला दुरावा
Govinda and Krushna Abhishek | (Picture Credit: Instagram)

'द कपिल शर्मा'(The Kapil Sharma Show) शो मध्ये नुकताच गोविंदा (Govinda) सोबतचा एक एपिसोड चित्रित करण्यात आला. कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) या शोचा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याच्या 'सपना' या भूमिकेवर तर सगळेच फिदा आहेत. कृष्ण हा गोविंदाचा भाचा असल्या कारणाने गोविंदा जेव्हा शूटला येणार तेव्हा धमाल होणार असा सगळ्यांचा कयास होता. पण प्रत्यक्षात झाले उलटेच. गोविंदा जेव्हा शूटिंग साठी आला तेव्हा कृष्णाला सेटवरती मज्जाव केला गेला होता. कृष्णाच्या सपना या पात्राचा भाग गोविंदा यायच्या आधीच चित्रित करण्यात आला. गोविंदाची पत्नी सुनीतानेच असे करण्यास सांगितल्याचे विधान कृष्णाने दिले आहे.

कृष्णा आणि गोविंदाचे संबंध ठीकठाक नसल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. आता त्या चर्चेला दुजोराच मिळाला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणतो की खरेतर मामा सोबत चित्रीकरण नसावे अशी सुनिताचीच इच्छा होती. त्यामुळे माझे चित्रीकरण आधीच उरकण्यात आले. मला खरे तर हे ऐकल्यानंतर आश्चर्यच वाटले तसेच काहीसे दुःखही झाले. या शो मध्ये 'सपना' हे माझं पात्र महत्वाचं पात्र असून मी सेलिब्रिटी आल्यानंतरही मजा करायला येत असतो. बहीण नर्मता तिच्या अल्बमच्या प्रमोशन साठी आली होती. आणि तिच्यासाठी हा दिवस खास होता जो मला खराब करायचा नव्हता. म्हणून मी काहीही बोललो नाही. मी जर माझ्या छोटया बहिणीसाठी इतकं करू शकतो तर मोठ्यांनी देखील पुढाकार घ्यायला हवा. एखाद्या घरातले वाद असे सार्वजनिक होत असतील तर ते दुर्दैवी आहे. (हेही वाचा. नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा ‘The Kapil Sharma Show' मध्ये ? पहा हा व्हिडिओ)

गोविंदा सोबतचे आपले संबंध चांगले असल्याचं सांगत कृष्णा म्हणतो की मामा आणि माझे सहा महिन्यांपूर्वीच मनोमिलन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही दुबईला भेटलो सुद्धा आहोत. तसेच सुनीता सोबतही पूर्वीसारखे संबंध प्रस्थापित करण्याचा आपला हेतू असल्याचंही कृष्णा पुढे म्हणाला.