नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा ‘The Kapil Sharma Show' मध्ये ? पहा हा व्हिडिओ
Navjot Singh Sidhu and Kapil Sharma (Photo Credits: Facebook)

कॉमेडीचा बादशाह Kapil Sharma कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहतो. मात्र यावेळी त्याने आपल्या सोशल मीडियाच्या मदतीने एक गौप्यस्फोट केलाय असं म्हणायला हरकत नाही.

‘The Kapil Sharma Show’ हा कॉमेडी शो भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि याच शोमधील एक पॉप्युलर नाव म्हणजे क्रिकेटपटू Navjot Singh Sidhu.

नुकताच कपिलने नवज्योत सिंग सिद्धू यांची नक्कल केलेला एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमधून कपिलने जरी कोणतीही औपचारिक घोषणा केली नसली तरी शोचे फॅन्स मात्र भलतेच आनंदात दिसून येत आहेत. सध्या सर्वत्र एकच चर्चा दिसून येत आहे ती म्हणजे नवज्योत यांच्या शो मधील पुन्हा एन्ट्रीची.

पहा कपिलने शेअर केलेला व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Jus for #fun guys 🤪 #navjotsinghsidhu @archanapuransingh #comedy #fun #laughter #thekapilsharmashow #tkss 😂🤗🙏

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि याचमुळे त्यांना ‘द कपिल शर्मा शो’ चा निरोप घ्यावा लागला होता.