प्रत्येक हंगामात लक्ष लागून राहात असलेला मान्सून अखेर केरळात (Monsoon 2021 Enter Kerala) दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने तीन जून रोजी मान्सून (Monsoon 2021) केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज मान्सूनने खरा ठरत केरळमध्ये प्रवेश केला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होताच देशभरात पावसळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. पुढचे चार महिने भारतात पावसाळा असणार आहे. केरळमध्ये आज पावसाने सुरुवात केली. आयएमडीनने दर्शवलेल्या अंदाजानुसार (IMD Forecast) यंदा भारतात मान्सून सामान्य राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी म्हटले की, दक्षिण पश्चिम मान्सूनने केरळच्या दक्षिण भागात उपस्थिती दर्शवली आहे. केरळमध्ये सर्साधारणपणे एक जूनला मान्सून हजेरी लावतो. कधी कधी यात एकदोन दिवस फरक पडतो. आज सकाळपासूनच केरळमध्ये मेघांनी दाटी केली होती. मेघांच्या या दाटीतच मान्सूनचे आगमन झाले. आयएमडीने या आधी म्हटले की, मान्सूनच्या भारतातील आगमन 31 मेला होईल. मात्र, आयएमडीने पुन्हा अपडेट देत 1 जून आणि त्यानंतर 3 जूनची तारीख दिली. (हेही वाचा, पावसाळ्यात बाजारात येणारी शेवग्याची शेंग तुमच्या जीवनात घडवेल जादू, वाचा या भाजीचे दहा भन्नाट फायदे)
आयएमडीने देशातील विभागवार वर्तवलेले मान्सून भाकीत
पूर्व भारत- सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी
मध्य भारत- सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी
हिमालय आणि मध्य पूर्व भारत- सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी
उत्तर पूर्व भारत- सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस
दक्षिण भारत (दख्खनचं पठार)- सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस
उत्तर पूर्वेकडील- सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस
आयएमडी ट्विट
SOUTHWEST MONSOON HAS SET IN OVER SOUTHERN PARTS OF KERALA TODAY, THE 03RD JUNE, 2021. DETAILS IN THE PRESS RELEASE TO BE ISSUED SOON@rajeevan61
— India Meteorological Department (@Indiametdept) June 3, 2021
भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनंध्ये पर्जन्यवृष्टी 92% ते 108% इतकी होऊ शकते. हाच मान्स दख्खनच्या पठारावर 93% ते 108% इतका कोसळू शकतो. याशिवाय उत्तर पूर्व भारतातही मान्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतात 95% तर मध्य भारतात 106% इतका पाऊस डपण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुलै महिन्या पर्जन्यमान कसे राहील याबाबत आयएमडी जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.